
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
लोणी -(ता.२४) लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा दिन नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रवरा अभिमत विद्यापीठ,लोणीचे डीन एअर वाईस चीफ मार्शल राजवीर भलवार होते.
विद्यार्थ्यांची संवाद साधतांना भलवार म्हणाले, विशेषतः आरोग्यावर अधिक भर दिला. खेळाडू वृत्ती म्हणजे आपले निरोगी आयुष्य होय. विद्यार्थ्यांनी आई-वडील शाळा, देश, गुरुजन यांच्या प्रति प्रामाणिक असले पाहिजे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक असणारा संतुलित आहार हा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. पिझ्झा बर्गर अशा पदार्थांपासून आताच दूर राहिले तर संपूर्ण आयुष्य निर्व्यसनी आणि उत्तम राहील. तसेच संरक्षणासाठी जॅकेट, हेल्मेट यासारख्या आवश्यक बाबींचा वापर आतापासूनच सुरुवात केल्या पाहिजे. आपली खिलाडू वृत्ती जपताना स्नेहभाव आणि संघवृत्ती जोपासली पाहिजे. असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्रतिक दळे यांनी केले .प्रमुख अतिथींचा सन्मान विद्यालयाचे कमांडट शेखर जोशी यांनी केले. याप्रसंगी कविता जोशी, प्राचार्य शंकर रिंगे, सुनील आसने, संजय तांबे क्रीडा शिक्षक बबन कुंलागे, प्रतीक दळे विद्यार्थी व सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.
