(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविले आहे. कु. सानिका डोंबाळे व कु. श्रावणी आमटे या दोघींची १९ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र हॉकी संघात निवड झाली अशी माहीती प्राचार्या विद्याताई घोरपडे यांनी दिली.
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कौशल्याची छाप पाडली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर त्यांची महाराष्ट्र संघात निवड झाली. डिसेंबर महिन्यात पंजाबमधील लुधियाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत त्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या खेळाडूंना विद्यालयाच्या प्राचार्या विद्याताई घोरपडे, सौ. कल्पना कडू, कु. श्वेता पाटील तसेच फुटबॉल प्रशिक्षक कु. स्नेहल सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे डॉ. महेश खर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.