अहिल्यानगर जिल्हाआमदार विवेकभैय्या कोल्हेकोपरगाव तालुका

कोपरगावात आ. विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून ५ नोव्हेंबरला ‘लोकसंवाद’ उपक्रमाचे आयोजन

नागरिकांनी २९ ऑक्टोबरपूर्वी समस्या, तक्रारी व मागण्यांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी, मागण्या आणि विकासकामांशी संबंधित प्रश्न जाणून घेऊन ते मार्गी लावण्यासाठी आ. विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘लोकसंवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडता येणार असून, संबंधित शासकीय विभागांकडून तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती मिळणार असल्याची माहिती आ.विवेक कोल्हे यांनी दिली आहे.

 

या उपक्रमाच्या आयोजनाबाबत आ. विवेक कोल्हे यांनी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या विविध समस्या, शासकीय कार्यालयांतील प्रलंबित प्रकरणे, तक्रारी आणि गावांमधील विकासकामांसंदर्भातील मागण्यांवर संबंधित विभागांनी योग्य कार्यवाही करावी, या उद्देशाने या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

 

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव, करंजी, सुरेगाव, धामोरी, चांदेकसारे, कोळपेवाडी, शिंगणापूर, संवत्सर, वारी आणि पोहेगाव या दहा गणांमधील प्रत्येक गावातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि मागण्यांचे अर्ज २९ ऑक्टोबर २०२६ पूर्वी सादर करावेत. अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असून, ऑफलाइन अर्जासाठी संबंधित गणप्रमुखांशी संपर्क साधता येणार आहे.

 

या लोकसंवाद कार्यक्रमासाठी महसूल, शेती महामंडळ, वन विभाग, जलसंपदा, पंचायत समिती, कृषी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पोलीस, परिवहन, नगरपालिका, समाजकल्याण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, सहकार आदी विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींबाबत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती द्यावी, अशा सूचना आ. विवेक कोल्हे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

 

नागरिकांचे प्रश्न संबंधित शासकीय यंत्रणांपर्यंत पोहोचविणे, प्रलंबित तक्रारींचा पाठपुरावा करणे, विविध विकासकामांशी संबंधित मागण्यांवर कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करणे आणि नागरिकांना त्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाकडून थेट माहिती मिळवून देणे, हा या लोकसंवाद उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.कोपरगाव तालुक्यातील दहा गणांमधील नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी व मागण्यांचे अर्ज २९ ऑक्टोबर २०२६ पूर्वी सादर करून या ‘लोकसंवाद’ उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या तक्रारींचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन आ. विवेक कोल्हे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!