(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – पायरेन्स आयबीएमएच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने व आत्मविश्वासाने करिअरच्या जगात भक्कम पाऊल ठेवले आहे. विविध नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या निवड होऊन संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांना व्यवसायिक जगात प्रवेश मिळवून देण्यासाठी पायरेन्स एमबीए विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. आर्थिक, बांधकाम, बँकिंग आणि विक्री क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड होणे ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व कौशल्याची पावती आहे विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर पायरेन्स आयबीएमएने ग्रामीण विद्यार्थ्याना नोकरी आणि रोजगार उपलब्धीमध्ये अव्वल स्थानावर असल्याची माहीती संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निकिता अरणे आर. ए. वरखडे अँड कंपनी( लेखापाल), प्राजक्ता कदम मावळा प्रॉपर्टीज( विक्री कार्यकारी) राजेश खामकर एसएमएफजी इंडिया क्रेडिट( क्रेडिट ऑफिसर) , प्रणाली लिहीणार स्पाइफ इंजिनिअरिंग (साईट सुपरवायझर) वैभव लोखंडे मळगंगा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर( साइट पर्यवेक्षक) , तुषार राजभोय एचडीएफसी बँक (पोर्ट पोलिओ ऑफिसर), ऋतुजा सातपुते डीसीबी बँक( रिलेशनशिप मॅनेजर), ऋषिकेश शिंदे रुरल शोअर (प्रोसेस असोसिएट) यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे विखे पाटील , डॉ. निलेश बनकर सचिव पायरेन्स, आणि आयबीएमएचे संचालक डॉ.मोहसीन तांबोळी यांनी अभिनंदन केले आहे.
संस्थेच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध कौशल्य प्रदान करण्यात आले या ठिकाणी असलेल्या विविध सेवा सुविधांमुळेच आम्हाला हे यश मिळवता आले असे प्रणाली लिहिणार यांनी सांगितले.




