
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना पाटस येथील विटगन इंडीया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असल्याची माहीती प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी दिली.
स्थापत्य अभियांत्रीकीमध्ये अग्रगण्य असलेल्या विटगन इंडीया प्रा. लि. या कंपनीमध्ये इमारत ऊभारणीसाठीचे विविध तंत्र आणि सेवा उपलब्ध आहेत. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. या कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक रूषिकेश गायकवाड, सुजित झा यांनी विद्यार्थ्यांच्या कँम्पस मुलाखती घेतल्या. यासाठी मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख सुहास ईनामदार यांची सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विविध कंपन्यांबरोबर शैक्षणिक कराराच्या माध्यमातून शेवटच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळण्यासाठी मोठी मदत होत असल्याचे प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणेसाठी ट्रेनिंग प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. मनोज परजणे, ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. राजेंद्र निंबाळकर, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व विभागातील ट्रेनिंग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी अभिनंदन केले.
