Warning: Undefined array key "fourth-footer-widget-area_2" in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104

Warning: Trying to access array offset on null in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104
जळगावचे ग्रामदैवत श्री.रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्राउत्सव कमिटीची कार्यकरणी जाहीर! – ahilyanagarkhabarbaat.com
धार्मिक

जळगावचे ग्रामदैवत श्री.रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्राउत्सव कमिटीची कार्यकरणी जाहीर!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – जळगाव (ता.राहाता) पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री.रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्राउत्सव सालाबादाप्रमाणे श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर (दि.४) ते (दि.६) एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे यापार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जळगावातील समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत यात्राउत्सव कमिटीची कार्यकरणी जाहीर करण्यात आली.

यावेळी जळगाव पंचक्रोशीचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी,अण्णासाहेब चौधरी,गणेशचे संचालक भाऊसाहेब चौधरी,गणेशचे संचालक संपतराव चौधरी,आदीसह पंचक्रोशीतील थोर-ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रोकडोबा महाराज यात्राउत्सव कमिटीच्या नूतन कार्यकरणीची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

 

 

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आगामी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत रोकडोबा मंदिरात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी यात्राउत्सव कमिटी अध्यक्षपदी उपसरपंच दिलीपराव चौधरी उपाध्यक्षपदी माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा युवा उद्योजक महेंद्र चौधरी तर खजिनदारपदी विजय भा.चौधरी यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली असून.या प्रसंगी यात्रा उत्सव कमिटीच्या सदस्यपदी जळगावचे सरपंच शिवाजीराव साबदे,अण्णासाहेब चौधरी,पंडित चौधरी, शिवाजी चौधरी, रमेश चौधरी,सुलतान शेख,अशोक शिंदे,प्रवीण चौधरी,बाबासाहेब चौधरी,राजेंद्र चौधरी,बाळासाहेब चौधरी,विजय चौधरी,महेश औताडे,किरण चौधरी,रवींद्र चौधरी,दत्तात्रय चौधरी,लक्ष्मण गायकवाड,बापूसाहेब पंडित,भागवत वाघ,डॉ.गोरक्षनाथ चौधरी,विकी वाघ,शाम चौधरी,जितेंद्र चौधरी आदी मान्यवरांची श्री.रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्रा उत्सव कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!