प्रवरा शिक्षण संस्था

कृषी शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना करिअर मध्ये मोठी संधी – डॉ.उत्तमराव कदम

प्रवरेचा विद्यार्थी हा आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रत्यक्ष कृतितून शिक्षण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – कृषी शिक्षण हि काळाची गरज आहे. बदलत्या कृषी धोरणांमुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहे. त्यामध्ये संशोधन, विस्तार, शिक्षण,व्यवसाय , विपणन इत्यादी क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून हि गरज कृषी शिक्षण घेतलेल्या पदवी अथवा पदविकाधारक यांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कृषी पदवीधरांना आणि पदविकाधारकांना करीअरच्या उत्तम संधी निर्माण झालेल्या आहेत आणि होतील असे आवाहन लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम यांनी केले आहे.  

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्था ही राज्यातील एक प्रमुख कृषी, जैवतंत्रज्ञान, अन्नतंत्रज्ञान व कृषी व्यवसाय व्यवस्थापन आदि क्षेत्रात पदवीचे तसेच कृषी तंत्रनिकेतन , पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन, माळी प्रशिक्षण आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध कृषी आधारित प्रमाणपत्र व पदविका शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे.  

मंञी विखे पाटील हे स्वतःहा कृषी पदवीधर असल्याने त्यांचा संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्य विकास व्हावा म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व सोई सुविधा पुरविण्याकडे भर असतो. डॉ. सुस्मिता विखे पाटील या विद्यार्थ्यांबरोबर नेहमी संवाद साधून आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यामध्ये अग्रगण्य असतात.

 

कृषी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी संस्थेमध्ये रोपवाटिका, प्रात्यक्षिक क्षेत्रावर जास्तीचा नफा मिळवून देणारे फुले व भाजीपाला उत्पादन, शेडनेट व पॉलिहाउस मध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुले व भाजीपाला उत्पादन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, दुग्धजन्य उपपदार्थ निर्मिती, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कौशल्य आधारित प्रशिक्षणे, शेतकरी संवाद व चर्चासत्रे, शिवारफेरी, पालक मेळावे, माजी विद्यार्थी तसेच कृषी क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्याने, प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विविध कृषी आधारित उद्योगांच्या परिसर मुलाखती आदी उपक्रम राबविले जातात.

 

तसेच या संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांना सवलतीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी सुविधा निर्माण करून दिल्या जातात.ज्यायोगे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व मनोबल वाढविण्यात मदत होऊन आंतरराष्ट्रीय पुढील शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या सर्व बाबीमुळे प्रवरा कृषी शास्त्र संस्थेमधून शिक्षण घेणारा विद्यार्थी हा परिपूर्ण होतो व त्याचे भविष्य उज्वल होण्यास मदत होते. संस्थेमध्ये उच्च विद्याविभूषित व अनुभवी प्राध्यापक वर्ग उपलब्ध असून ते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे जे विद्यार्थी दहावी व बारावी नंतर कृषी शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांनी लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत निश्चित प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम यांनी केले आहे. 

 

कृषी संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिकणारा कृषीचा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न व्हावा यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्यावर संस्थेचा भर राहिला आहे. आज पर्यंत या महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध प्रयोग हे करण्यात आले आहे. ते प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाविद्यालय आणि विद्यार्थी हे करत आहे. नोकरी बरोबरच प्रवरेच्या कृषी शास्त्र संस्थेचा विद्यार्थी हा आत्मनिर्भर व्हावा यासाठी त्यांना वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान ते थेट मार्केटिंग पर्यंत ज्ञान दिले जाते. अन्नप्रक्रिया याविषयी देखील माहिती जाते. प्रवरेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर उज्वल केले आहे. 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!