अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

गोंडेगावच्या ‘पीएमश्री’ जिल्हा परिषद शाळेचा डंका! ‘फोपसे’ अन् ‘कासार’ची थेट ‘इस्त्रो’ विमानवारी साठी निवड गोंडेगाव पॅटर्न चे अतुलनीय यश

मुख्याध्यापक व शिक्षकांच्या अथक प्रयत्नांना यश; ग्रामीण भागातील बालवैज्ञानिकांची अंतराळ संशोधनाकडे झेप

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

गोंडेगाव – गुणवत्ता आणि आधुनिक शिक्षणाचा नवा वस्तुपाठ घालून देणाऱ्या येथील श्रीरामपूर तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंडेगावचा डंका आता थेट जिल्हा आणि राज्य पातळीवर वाजला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अत्यंत मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या ‘इस्त्रो विमानवारी’ शैक्षणिक सहल निवड परीक्षेत या शाळेतील यशराज शिवनाथ फोपसे आणि श्लोक गणेश कासार या दोन गुणवंत बालवैज्ञानिकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) अभ्यास दौऱ्यासाठी अंतिम निवड झाल्याने गोंडेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा आणि अंतराळ विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर कडक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या अत्यंत चुरशीच्या परीक्षेत गोंडेगावच्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत अंतिम यादीत स्थान मिळवले.मुख्याध्यापक अन् शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाची जोड यामुळे या शाळेने शैक्षणिक गुणवत्तेत नेहमीच आघाडी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामागे शाळेत राबविले जाणारे ‘गोंडेगाव पॅटर्नचे हे यश आहे.

त्यामुळे तीन वर्षापासून शाळेच्या विदयार्थी इस्रो सहलीस जात आहे.याही वर्षी तालुक्यातील तीन विधार्थी पैकी दोन विदयार्थी गोंडेगावचेच या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीमती वैशाली सोनवणे मॅडम आणि वर्गशिक्षक राजेंद्र पंडित सर , निर्मळ सर , बनकर सर , नानासाहेब पंडीत सर , सौ पंडीत मॅडम , तांबोळी मॅडम , गायकवाड सर यांचे दर्जेदार व सूक्ष्म मार्गदर्शन लाभले. तसेच, विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शाळेतील शिक्षक यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि दिलेल्या विशेष योगदानामुळेच शाळेचा डंका सर्वत्र गुंजला आहे. निवड झालेल्या फोपसे आणि कासार या विद्यार्थ्यांना विमानाने प्रवास करून इस्त्रो केंद्राला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या दौऱ्यात हे विद्यार्थी प्रत्यक्ष रॉकेट तंत्रज्ञान, उपग्रहांची निर्मिती जवळून अनुभवणार असून, देशातील थोर अंतराळ शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधून विज्ञानाचे प्रगत धडे गिरवणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल बी डी ओ घोरपडे मॅडम, शिक्षणाधिकारी दिपक त्रिभुवन , विस्तार अधिकारी दरंदले साहेब ‘केंद्रप्रमुख शितल गायकवाड मॅडम , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांच्या सह गोंडेगावातील ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले .

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!