प्रशासकीयमहाराष्ट्र

जिल्हा वार्षिक योजनेतुन जळगाव येथील दोन मुख्य रस्त्यांच्या कामांना मंजुरी; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते भूमिपूजन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील जळगाव येथील दोन प्रमुख रस्त्यांच्या कामांना जिल्हा वार्षिक योजना तसेच स्थानिक खासदार निधीअंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नुकतेच या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (संगमनेर) तसेच सार्वजनिक उपबांधकाम विभाग कोपरगाव यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या स्थानिक खासदार निधीतून मौजे जळगाव येथील महेंद्र चौधरी यांच्या घरापासून रेल्वे चौकीपर्यंत असलेल्या जुन्या खैरी रोडच्या मजबुतीकरणासाठी ९ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच जळगावा ते लालवाडी रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ९ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून,दोन्ही रस्त्यांची कामे लवकरच पूर्णत्वास येणार आहेत.

या रस्त्यांच्या कामांमुळे ग्रामस्थांची वाहतूक सुलभ होणार असून पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले जटिल प्रश्न खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी या विकासकामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी तसेच सरपंच शिवाजी साबदे तसेच शिवसेना उबाठा गटाचे तालुकाउपप्रमुख बाबासाहेब चौधरी, विजय चौधरी, डॉ. गोरख चौधरी यांनी समस्त ग्रामस्थांच्या वतीने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार करून सन्मान केला.याप्रसंगी खा. वाकचौरे यांनी सत्काराचा स्विकार करत ग्रामस्थांच्या विविध विकासात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.गावातील इतर मूलभूत गरजांबाबत खासदार वाकचौरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा तसेच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा समन्वयक मुकुंद शिंनगर,उपतालुकाप्रमुख बाबासाहेब चौधरी, अण्णासाहेब चौधरी, विजय चौधरी, सरपंच शिवाजी साबदे, महेंद्र चौधरी, बाळासाहेब चौधरी, डॉ. गोरख चौधरी, प्रकाश गुंड, लहानू चौधरी, नुराभाई शेख, दिलीप शिन्नरकर, गोटू शिंदे, बाळासाहेब शेलार, दिलीप चौधरी, अशोक वाघ, रामकृष्ण आदमाने, विनायक आदमाने आदीसह जळगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!