अहिल्यानगर जिल्हा

अहिल्यानगरच्या ८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४०३कोटी रुपये जमा -ना.राधाकृष्ण विखे पाटील 

संकटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असून नूकसानीपोटी अग्रीम मदत जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत जमा झाली आहे. या माध्यमातून सुमारे ४०३ कोटी ६४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्त्यात वर्ग झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा अहील्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 

 जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर या मदत वितरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाचे दिलेली ओढ , पिकांची झालेली हानी, घटलेले उत्पादन आणि वाढता शेतीचा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.राज्य सरकारने नूकसानीपोटी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिवाळीपुर्वी देण्याची घोषणा केली होती.

 

  दुष्काळाची गंभीरता लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेवून प्रत्येक तालुक्यातील परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल यांना सादर केला होता. प्रशासनाला आवश्यक उपाय योजनांसाठी सूचना दिल्या होत्या. 

 

राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीसाठी पहील्या ट्रीगर मध्येच जिलह्याचा समावेश झाल्याने शासनाकडून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी पाठपुरावा केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मदत वितरणाची प्रक्रिया राबविली. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे८ लाख ७ हजार २८४ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ४०३कोटी ६४ लाख रूपये जमा झाले आहेत. थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून ही मदत वितरित झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.

 

शेतकऱ्यांवरील संकटाच्या काळात त्यांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देणे आवश्यक आहे, ही भूमिका पालकमंत्री विखे पाटील यांनी सातत्याने मांडली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, वीजपुरवठा आणि शेतीच्या नुकसानीसंदर्भात प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजनांचा आढावा मंत्री विखे पाटील सातत्याने घेत आहेत.

आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या गरजा भागविण्यासाठी आधार मिळणार असून आगामी शेती हंगामाच्या तयारीसाठीही या रकमेचा उपयोग होऊ शकतो. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंतही मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!