
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेतील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी शिवम गोजरे यांची ड्रोन डेस्टिनेशन या कंपनीमध्ये फार्म एक्झिक्युटिव्ह पदावरती निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष क्षीरसागर यांनी दिली आहे.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी प्रवरा कृषी शास्त्र संस्था विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी, कार्यानुभव उपक्रम इ. उपक्रमाचा समावेश होतो.
विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ.विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम आदींनी अभिनंदन केले आहे.




