महाराष्ट्रसामाजिक

नगरसेविका सोनियादीदी कक्कड यांची प्रभाग क्रमांक १ येथील अंगणवाडीला भेट; आशा वर्कर मुक्ता गवळी यांच्या कार्याचे केले कौतुक!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी – गोपाल शिंदे 

 

श्रीरामपूर – शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील फातिमा हाऊसिंग सोसायटी येथील शासकीय अंगणवाडीला प्रभाग क्रमांक १ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सोनियादीदी कक्कड यांनी आज भेट देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.यावेळी अंगणवाडी शिक्षिका बेबी शेख,आशा वर्कर मुक्ता गवळी यांच्यासह इतर आशा सेविकांनी नगरसेविका सोनियादीदी कक्कड यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.यावेळी आश्विनी अनिल वाघ उपस्थित होत्या.

नगरसेविका पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून,याच अनुषंगाने त्यांनी अंगणवाडीतील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.अंगणवाडी ही समाजाच्या जडणघडणीचा पाया असल्याचे सांगत, या ठिकाणी स्वच्छता, शिस्त आणि बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

यावेळी बोलताना सोनियादीदी कक्कड म्हणाल्या की, आशा वर्कर या पदावर कार्यरत असलेल्या महिला अतिशय जबाबदार असून त्या लहान बालकांना योग्य संस्कार देत त्यांचा प्रेमाने व काळजीपूर्वक सांभाळ करतात. समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा सेविकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

तसेच परिसरातील सर्व अंगणवाड्यांना आवश्यक ते सहकार्य करून त्यांच्या प्रश्नांसाठी श्रीरामपूर नगरपालिकेत सातत्याने पाठपुरावा करून मदत केली जाईल,महिला कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्वतोपरी सहकार्य करणार असा शब्द नगरसेविका सोनियादीदी कक्कड यांनी उपस्थित सर्व आशा वर्कर्सना दिला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!