क्रीडामहाराष्ट्र

गोंडेगाव येथील पै.सौरभ म्हैस गाजवतोय कुस्त्यांचे मैदान!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंडेगावचे ग्रामदैवत येडूआई माता (जगदंबा माता) दोन दिवसीय यात्रा उत्सवाची कुस्तीच्या (दि.३ एप्रिल) आखाड्याने सांगता झाली.यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यासह समस्त राज्य भरातून नामांकित मल्ल,वस्ताद यांनी कुस्तीसाठी हजेरी लावली होती.परंतु आयोजित कुस्तीच्या आखाड्यात गोंडेगाव येथील रहिवासी व तरुण तडफदार मल्ल सौरभ म्हैसच्या मानाच्या कुस्तीत उत्कृष्ट प्रदर्शनाने कौतुकास पात्र ठरला त्याच्या कुस्तीच्या डावपेचाने कुस्तीप्रेमी अक्षरश; भारावून गेले अंन..अवघ्या काही क्षणात ग्रामीण भागातील रांगडा गडी सौरभने संपूर्ण कुस्तीचा आखाडाच गाजवला.

गोंडेगाव येथील येडूआई यात्रेच्या सांगता प्रसंगी भव्य कुस्त्याचा हंगामा आयोजित करण्यात आला यावेळी पैलवान सौरभ म्हैस समवेत गुरु तथा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान रवींद्र वाघ यांच्यासह समस्त गोंडेगावकर ग्रामस्थ..

यावर्षी गोंडेगावातील संतोष (धोंडीराममामा) सुर्यभान म्हैस यांचा पुत्र पैलवान सौरभ म्हैस व राहुरी येथील शिवराज बिडवे यांच्यामध्ये मानाची कुस्ती झाली यात सौरभने कुस्तीचा उत्कृष्ट नमुना दाखवत बाजी मारून थेट कुस्तीचा संपूर्ण आखाडा गाजविला.अन काहीच वेळेतच समोरच्या पैलवानाला चितपट करून ‘हम किसीसे कम नही’ असे म्हणत ग्रामस्थांसह कुस्तीप्रेमींकडून कौतुकाची थाप मिळवली. परंतु कुठल्याही क्षेत्रात ‘यश’ हे सहजा सहजी मिळत नाही यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात याचे उदाहरण सौरभ म्हैस हा आहे कुस्तीमध्ये घडण्यासाठी त्याने अनेक कष्ट घेतले आहेत त्याने मिळवलेले यश हे आज त्याच्या कामाची पावती बनून राहिले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील मूळचा रहिवासी असलेला सौरभ म्हैस लहानपणापासूनच कुस्तीप्रेमी आहे
कमी वयातच कुस्ती खेळाविषयी आपुलकी निर्माण झाली.
आपणही कमी वयात कुस्ती शिकावी व मैदान गाजवावे असे त्यास वाटू लागले त्यामुळे सौरभचे कुस्ती खेळाकडे खूप आकर्षण वाढू लागले कुस्ती शिकायचे म्हटल्यावर गुरुस्थानी कुणीतरी असायला पाहिजे असा विचार त्याने केला.त्याचे वडील संतोष म्हैस उर्फ (धोंडीराममामा) हे सर्वसामान्य शेतकरी असून त्यांनी शेतीमध्ये काबाड कष्ट करून कुस्त्याच्या मैदानामधून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे भव्य कुस्त्याच्या हंगाम्याच्या वेळी कुस्त्या पाहण्यासाठी झालेली गर्दी..

यामुळे सौरभने प्रथम आपल्या वडिलांकडूनच कुस्तीचे ज्ञान घेतले.त्याला खेळण्या बागडण्याच्या वयातच कुस्तीची आवड निर्माण होऊ लागली अश्यातच त्यांने अतिशय.कमी वयातच घरापासूनच कुस्ती शिकण्यास सुरुवात केली.आपला मुलगा शिकावा याचबरोबर त्याने पैलवानकी देखील करावी असे त्याच्या वडिलांचे म्हणणे होते यामुळे सौरभने देखील आपल्या आई-वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन व कुस्ती विषयी असलेले प्रेम जोपासून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढे कुस्तीची तयारी करू लागला त्याला अडचणी खूप येत होत्या परंतु त्या अडचणींना तोंड देत त्याने कुस्तीचे डावपेच व ज्ञान अवगत करून घेतले.

वडील पै.संतोष म्हैस यांच्या समवेत पै. सौरभ म्हैस..

 

भविष्यात कुस्तीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख करायची आहे या हेतूने त कालांतराने त्याने २०१८ साली त्याने वयाच्या अवघ्या सतराव्या राहाता तालुक्यातील चितळी येथील महाराष्ट्र चॅम्पियन असलेले तसेच अनुभवी पैलवान रविंद्र वाघ यांना गुरुस्थान देवून त्यांच्याकडून कुस्तीचे धडे घेण्यास सुरुवात केली.’जैसा गुरु तैसा चेला’अशी म्हण प्रचलित आहे याच म्हणीप्रमाणे सौरभचे मानलेले गुरु पैलवान रवींद्र वाघ हे देखील अनेक कुस्त्यांचे आखाडे गाजवणारे व्यक्तिमत्व होते त्यांनी महाराष्ट्र चॅम्पियन हा खिताब देखील पटकवलेला आहे.
अश्यातच पैलवान रवींद्र वाघ यांनी सौरभ म्हैस सारख्या शिष्याला कुस्त्यांच्या मैदानातील सर्व रणनीत्या शिकवून कुस्ती खेळाचे संपूर्ण ज्ञान अवगत करून दिले.कुस्ती शिकत असताना सौरभने शिक्षणाकडेही लक्ष केंद्रित केले व प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक,शिक्षणही पूर्ण केले यांचबरोबर तरुण वयातच त्याने कुस्त्यासारख्या रांगड्या खेळाची आवड जोपासून आजपर्यंत  महत्त्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या अनेक ठिकाणी कुस्तीचे आखाडे गाजवत आहे. सौरभने आपला कुस्तीचा प्रवास हा अविरत सुरू ठेवला असून एवढ्यावर न थांबता,कोल्हापूर,पैठण,जालना, अशा जिल्ह्यातील नामांकित गाजलेल्या तालमी मध्ये त्याने पैलवानकीचे शिक्षण घेतले आहे.याचबरोबर गोंडेगावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात लौकीक केले आहे.या गोष्टीचा अभिमान सर्व गोंडेगावकरांना नक्कीच वाटत आहे.त्याचा आदर्श हा प्रत्येक तरुणाने घेतला पाहिजे.
पैलवान सौरभ म्हैसने सांगितले की भविष्यात कुस्ती खेळाकडे घोडदौड अशी सुरू ठेवणार असून माझे महाराष्ट्र केसरी  किताब मिळविण्याचे स्वप्न असून आई वडील व गोंडेगावाचे नाव उज्वल करण्याचा मानस आहे हे स्वप्न लवकरच पुर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया पैलवान सौरभ म्हैसने दिली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!