प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींचे ‘एनएमएमएस’ परीक्षेत यश शिष्यवृत्तीसाठी झाली निवड!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर, लोणी येथील सात विद्यार्थिनी पात्र झाल्या आहेत.अशी माहीती प्राचार्या सौ.भारती कुमकर यांनी दिली.

 

कु. पूर्वजा कुदळ आणि कु. समृद्धी मगर या दोन विद्यार्थिनींची गुणवत्ता यादीत निवड झाली असून त्यांना नववी ते बारावीपर्यंत प्रतिवर्ष १२ हजार रुपये अशी एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच दोन विद्यार्थिनी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या असून त्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत प्रतिवर्ष ९,६०० रुपये अशी एकूण ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

 

प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या माध्यमातून विविध शिष्यवृत्ती बरोबरच विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी त्यांना स्वतंत्र मार्गदर्शन हीहोत असते. यामुळे प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनी या विविध स्पर्धेमध्ये कायमच अव्वल स्थानावर राहिल्या आहेत.सदर विद्यार्थिनींना प्राचार्या सौ.भारती कुमकर , पर्यवेक्षक नामदेव भुसाळ , सौ. विद्या घोरपडे, नितीन शिरसाठ, रविंद्र डगळे , योगेश दिघे,अनिल बोंबले,सागर मोघे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.

घौ पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.                 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!