
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
लोणी: (ता.२६) – पुणे विभागीय मुले वयोगट १७ व १९ शुटींग बाॅल सोलापूर येथे यशस्वी पार पडलेल्या स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय दाढ बुद्रुक येथील राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर तर साई साळवे या विद्यार्थ्याची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य विलास थेटे यांनी दिली.राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी ओंकार पवार, यश थेटे आणि सई साळवे यांची यांची तर राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय साई साळवे यांची निवड करण्यात झाली आहे त्यांना क्रिडाशिक्षक नितीन साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षणाबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांना खेळाचेही शिक्षण मिळावे यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न होत असतात. प्रवरेच्या प्रत्येक शाळेमध्ये सुसज्ज क्रिडांगणासोबतच तज्ञ असे क्रीडा शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे प्रवरेचे विद्यार्थी हे विविध क्रीडा प्रकारात अग्रेसर आहेत. प्रवरेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे,प्राचार्य विलास थेटे,पर्यवेक्षक नंदकुमार इंगे आदींनी अभिनंदन केले आहे.
