अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

निरोगी बालके हीच सुदृढ समाजाची पायाभरणी – नारायणराव कदम

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त चितळी व स्टेशन परिसरातील शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – निरोगी बालके हीच सुदृढ समाजाची पायाभरणी असून, प्रत्येक बालकाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालकांना जंतसंसर्गापासून संरक्षण मिळावे आणि त्यांची शारीरिक वाढ व आरोग्य चांगले राहावे, यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या जंतनाशक गोळी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन चितळी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम यांनी केले.

 

राहाता तालुक्यातील चितळी येथे मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या समन्वयातून राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने एक ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.परिसरातील अंगणवाड्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चितळी गाव व स्टेशन तसेच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चितळी येथे विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.यावेळी आरोग्य सेवक अमरजीत जाधवर, समुदाय आरोग्य अधिकारी पूजा डांगे, आरोग्य सेविका लक्ष्मी वाघमारे, अंगणवाडी मदतनीस दीपाली साळुंके, आशा सेविका संगीताताई गायकवाड,मंदाताई साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

जंतसंसर्गामुळे बालकांमध्ये रक्तक्षय, भूक मंदावणे, वजन वाढण्यास अडथळे तसेच पोषणविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जंतनाशक औषधोपचार महत्त्वाचे आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार करून घ्यावेत. तसेच विद्यार्थ्यांना नियमित हात धुणे, स्वच्छ पाणी पिणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यांसारख्या आरोग्यदायी सवयी लावाव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!