यशवंत सामाजिक प्रतिष्ठानसामाजिक

रचनात्मक काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव शैक्षणिक संकुल परिसरास दिल्याचा मनस्वी अभिमान – पदमश्री पोपटराव पवार

प्रशांत गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त दंत महाविद्यालयाचे संकुल नामकरण,वाचनालय इमारत भुमिपूजन व वृक्षारोपण दिन सोहळा संपन्न!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 प्रतिनिधी -राहुल राजळे

 

सोनई:(ता.२७) – यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय वडगाव गुप्ता येथे शैक्षणिक संकुलाचे प्रशांत संकुल प्रवेशद्वाराचे लोकापर्ण विद्यार्थ्यांना अभ्यासाठी व अवांतर वाचनासाठी आवश्यक ओपन (मुक्त) वाचनालय इमारत भूमिपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवार (दि.२७.डिसेंबर) रोजी पदमश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते व माजी मंत्री शंकरराव गडाख,मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख,यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष नेहल गडाख,डॉ सुभाष देवढे पाटील कार्यकारी संचालक यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत डॉ सुभाष देवढे यांनी केले.यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना पदमश्री पोपटराव पवार म्हणाले सामाजिक कार्यात जीव ओतून काम करणारे व्यक्तीमत्व म्हणजे प्रशांत गडाख.दंत महाविद्यालयासाठी झोकून देऊन माळरानावर शैक्षणिक संकुल उभे करून रचनात्मक काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचे नाव शैक्षणिक संकुलाच्या परिसरास दिल्याचा मनस्वी अभिमान असल्याचे सांगून यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय वडगाव गुप्ताच्या संकुलास प्रशांत गडाख यांचे नाव दिल्याचे कौतुक केले.सध्याच्या काळात मौखिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेतत्या मुळे दंत महाविद्यालयातुन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य आहे.महाविद्यालय व परिसरात आवर्जून करण्यात आलेल्या वृक्षारोपण व संगोपनामुळे महाविद्यालय परिसराला वनराईचे रूप आले आहे.

येणाऱ्या काळात पर्यावरण संवर्धन होणे गरजेचे आहेयशवंत प्रतिष्ठान सारख्या संस्था स्वतःहून यात पुढाकार घेतात ही बाब अभिनंदनिय असल्याचे पदमश्री पोपटराव पवार म्हणाले.पदमश्री पोपटराव पवार व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते नेवासा तालुक्यातील हिंगोनी,सोनई,मोरया चिंचोरे,शिरेगाव,म्हाळस पिंपळगाव येथील सार्वजनिकपुस्तके भेट देण्यात आली यावेळी नगर शहरासह नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील संस्थेचे पदाधिकारी, प्रशांत गडाख मित्रमंडळाचे सदस्य , महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार नेहल गडाख यांनी मानले.

 

 

‘या प्रसंगी उदयन गडाख बोलताना म्हणाले प्रशांत गडाख यांनी ज्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात केली ते सामाजिक उपक्रम राबवून आपण आज त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहोत यापुढेही यशवंत सामाजीक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.’

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!