Uncategorized

नवनागापूर एमआयडीसीतील अवैध मावा कारखान्यावर पोलिसांचा छापा; ८.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जण अटकेत

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत नवनागापूर एमआयडीसीमधील एका मावा बनवणाऱ्या अवैध कारखान्यावर छापा टाकून एकूण ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष पोलिस पथकाने दि. २२ जुलै २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे आनंदनगर, नवनागापूर येथील एका इमारतीच्या टेरेसवरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर कारवाई केली.

 

या ठिकाणी छापा टाकून शुभम दत्तात्रय हजारे (रा. केडगाव), मंजितकुमार विजयकुमार सिंग (रा. बिहार), आकाश शिरसाट, प्रशांत नवथर आणि महेश खराडे या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १४० किलो तयार मावा, ७२ किलो सुगंधीत तंबाखू, ७० किलो कच्ची मावा सुपारी, तयार मावा बनविण्याची मशीन, सुपारी कटिंग मशीन आणि फोक्सवॅगन पोलो कार असा एकूण ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

ही कारवाई नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राजेंद्र वाघ,पोहेकॉ शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे आणि दिपक जाधव यांच्या पथकाने केली.पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन अधिनियमाचे उल्लंघन, तसेच सार्वजनिक आरोग्यास धोकादायक खाद्यपदार्थ विक्रीप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!