अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

निमगाव खैरीत गरजू कुटुंबांची दिवाळी गोड; ‘आनंद शिधा’चे वाटप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील उपक्रमाला प्रतिसाद; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा घरोघरी जाऊन मदतीचा हात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि गोरगरीब कुटुंबांनाही सणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘दिवाळीचा शिधा – आनंद शिधा’ उपक्रमांतर्गत निमगाव खैरी येथे गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील गरजू कुटुंबांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शिध्याचे वाटप केले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या सणानिमित्त गोरगरीब कुटुंबांच्या घरातही आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, त्यांनाही दिवाळीचा फराळ करता यावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत निमगाव खैरी येथील अनेक गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या शिधा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश तांबे, विभागप्रमुख आदिनाथ भाकरे आणि ज्येष्ठ शिवसैनिक दत्तात्रय गमे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिधा वाटप केले.

यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख राजेश तांबे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाची शिकवण तसेच धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेला सेवाभाव हाच आदर्श ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या सणाला कोणाचेही घर अंधारात राहू नये, प्रत्येकाच्या घरात गोडधोड व्हावे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचावी, या उद्देशाने आनंद शिधाचे वाटप करण्यात येत आहे.आनंद शिधा मिळाल्याने गावातील महिलांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या या मदतीमुळे दिवाळीचा सण अधिक आनंदात साजरा करता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गरजू कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून मदत करण्याच्या या उपक्रमाचे निमगाव खैरी परिसरातून कौतुक होत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!