
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – परकीय मोगल अक्रांतकांपासून ज्यांनी हिंदू धर्म वाचवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पावलोपावली अपमान करणारे आजही मोकाट आहेत पण हिंदूंचे मोठ्याप्रमाणात धर्मपरिवर्तन करून त्यांना ख्रिश्चन करणाऱ्या सेंट झेवीयरच्या हिंदूद्वेषी कार्याबाबत हिंदू संमेलनात बोलणाऱ्या हिंदू धर्मप्रसारक गौतम खट्टर यांना गोवा पोलीस उत्तर प्रदेशातून अटक करून आणतात हे हिंदूंचे खूप मोठे दुर्भाग्य असून हिंदू एकजूट होत नाही तोपर्यंत अशा घटनांना बळ द्यायचे काम हिंदूद्वेष्टे विधर्मी करत राहतील त्यासाठी हिंदूंनी एकजुट होण्याचे कळकळीचे आवाहन हिंदू धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित विराट हिंदू संमेलन प्रसंगी हिंदू धर्मरक्षक सागर भैय्या बेग हे बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सिने अभिनेता मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई रमेश परदेशी,धर्मजागरणचे प्रांत कार्यकारिणी सदस्य सुनीलजी काळे तर धर्मवीर मिलिंदभाऊ एकबोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित होते.कायदे कडक नसल्याची खंत व्यक्त करत सागर बेग पुढे म्हणाले की, लव जिहाद,गोहत्याबंदी कायदा कडक झाला पाहिजे म्हणून पश्चिम महाराष्ट्रात जवळपास पाचशेच्या वर मोर्चे काढले तेंव्हा कुठं विधानसभेत त्यावर चर्चा होऊन कायदा केला पण शिक्षा सात वर्षाची असल्याने आरोपी अशा कायद्यांना जुमानत नाही असे सांगून ते म्हणाले की,सुप्रीम कोर्टाने तर एखाद्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा असेलतर नोटीस देऊन सोडून देण्याची कायद्यात तरतूद करून ठेवल्याने लवजीहाद मधील हिंदू मुलींना न्याय कसकाय मिळणार असा सवाल सागर बेग यांनी यावेळी व्यक्त करून ते पुढे म्हणाले की,अल्पवयीन मुलीच्या अन्याय अत्याचारावर कायद्यात वीस वर्षे सजेची तरतूद असतांना काही आरोपी नोटीस घेऊन आज बाहेर फिरत आहेत पॉस्को कायद्याचा कठोरतेने पालन केल्यास आरोपींना जरब बसेल असेही त्यांनी म्हंटले आहे.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदुत्व टिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर आज फक्त राजकारण करण्यासाठीच केला जात आहे.महाराष्ट्रात २८८ आमदार आहेत ते महाराजांच्या नावावरच आज विधानसभेत आहेत परंतु काही मोजके सोडले तर कोणत्याही आमदारांनी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी असा कायदा राज्यात झाला पाहिजे अशी आग्रही मागणी विधानसभेत केलेली नाही.आणि जोपर्यंत तसा कठोर कायदा महाराजांच्या अपमानाच्या विरोधात होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा शांत बसणार नसल्याचा थेट ईशाराच धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांनी दिला आहे.
याप्रसंगी धर्मवीर मिलींदभाऊ एकबोटे यांचे सर्वसमावेशक असे अभ्यासपूर्ण भाषण झाले तर सिनेअभिनेते रमेश परदेशी व धर्मजागरणचे सुनीलजी काळे यांनी देखील उवस्थितांना मार्गदशनपर भाषणे केली.राष्ट्रीय श्रीराम संघाचे राहता तालुकाध्यक्ष मदनभाऊ मोकाटे, संकेतभाऊ चव्हाण,तुषारभाऊ थेटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.




