कोपरगाव तालुकाभौगोलिकमहाराष्ट्रशेती

कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानातुन उस उत्पादनात हमखास वाढ -शास्त्रज्ञ एन.एन.पाटील

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगांव-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सातत्यांने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी कार्यक्षम वापर केला असुन कारखान्याचे युवा अध्यक्ष आमदार विवेक भैय्या कोल्हे हे कृत्रिम बुध्दीमत्ता (ए आय) तंत्रज्ञानाच्या राज्यस्तरीय समितीवर काम करीत असल्यांने त्यातुन सभासद शेतक-यांचे उस उत्पादनात हमखास वाढ करत असल्याचे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे शास्त्रज्ञ डॉ. एन. एन. पाटील यांनी केले,

 

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उस उत्पादक सभासद शेतक-यांसाठी उस शेतीतील कृत्रीम बुध्दीमत्ता (ए आय) आढावा व हुमणी कीड नियंत्रण कार्यशाळा बुधवारी घेण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.

 

प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा सादर करून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे हे उस उत्पादन वाढीसाठीच्या धडक योजना थेट सभासद शेतक-यांच्या बांधापर्यंत राबवित असुन कमी खर्चात अधिकचे उत्पादन कसे मिळवायचे याबाबतचे मार्गदर्शन सातत्यांने करत आहेत.

 

श्री. एन.एन. पाटील पुढे म्हणाले की,वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट व बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमांतुन येथील उस उत्पादक शेतक-यांसाठी कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यांत आले असुन गेल्या दोन दिवसापासुन या कार्यक्षेत्रातील शेतक-यांच्या उस प्लॉटला समक्ष भेट देवुन त्यातुन उस पानांचे नमुने गोळा करून शेतक-यांना तंत्रज्ञान वापरात येणा-या अडी अडचणी समजावुन सांगत उपग्रहाद्वारे पिकांच्या छायाचित्रांचे विश्लेषण करून कुठे कमी जास्त पाणी आहे, कुठे खतमात्रा कमतरता आहे, किडींचा प्रार्दुभाव वाढला, आहे अगर किडीची लागण होणार आहे इत्यादी सर्व सुक्ष्म बाबींचे मार्गदर्शन करून उस उत्पादन वाढीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले जात आहे. याप्रसंगी कृषीतज्ञ व बारामती कृषी विज्ञान केंद्राचे व्यवस्थापक एम. ए. जाधव, एस.ए. वालकुंदे, एस एस. पडोळ, नितीन शिंदे यांनी कृषक, मॅप मायक्रो क्रॉप व फसल अॅप बाबत माहिती देवुन मार्गदर्शन दिले व शेतक-यांच्या विविध अडचणींचे शंका निरसन केले. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे शास्त्रज्ञ डॉ. तुषार शितोळे यांनी हुमणी कीड नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देवुन त्यासाठी प्रकाश सापळे कसे वापरावयाचे याचे मार्गदर्शन केले.

 

याप्रसंगी संचालक सर्वश्री. बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, विलासराव माळी, कैलासराव माळी, साहेबराव रोहोम, शरद थोरात, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, राहुल वक्ते यांच्यासह खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!