महाराष्ट्र

विना अट सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; अन्यथा वाकडीत बेमुदत अन्नत्याग व साखळी उपोषण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील वाकडी (खंडोबाची) येथे शेतकरी संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत “विना अट सरसकट कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचे सातबारा कोरे झाल्याशिवाय आंदोलन थांबविणार नाही” असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

 

या ठरावाबाबत सोमवार, दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजता अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच आठ दिवसांच्या आत विना अट सरसकट कर्जमुक्ती जाहीर करून शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्यात आले नाहीत, तर प्रसिद्ध प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकडी (खंडोबाची) येथे बेमुदत अन्नत्याग व साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

 

बैठकीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, रूपेंद्र काळे, अनिल देवकर, महेश लहारे, ज्ञानेश्वर सोडनार आदींनी मनोगत व्यक्त केले. सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती ही खरी कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील शेतकऱ्यांनी शांत न बसता एकजूट करून आपल्या हक्कांसाठी संघर्ष उभारावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 

या बैठकीस शिवाजीराव लहारे, मुरलीधर शेळके, गणेश कारखान्याचे संचालक आलेश कापसे, विष्णूपंत शेळके, सुरेश आबा लहारे, संजय शेळके, शंकरराव लहारे, महेश जाधव, अमोल शेळके, निलेश लहारे, संजय भवार, मंच्छिंद्र एलम, सावळेराम आहेर, मंच्छिंद्र भवार, बी. एम. लहारे, दत्तात्रय कोते, तात्यासाहेब गोरे, बी. एल. आहेर, अशोक लबडे, अमृतराव कोते, प्रदीप जगदाळे, चांगदेव पावसे, शशिकांत एलम, बाळासाहेब कुरकुटे, विष्णूपंत लहारे, नितीन साबदे, संजय एलम, संजय पावसे, गोरक्षनाथ साबदे, ज्ञानेश्वर कोते, दिलीप जाधव यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!