अहिल्यानगर जिल्हा

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर व गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश!

सुवर्ण ६१, रौप्य ४० आणि कांस्य १२ अशा एकूण ११३ पदकांची कमाई

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय, राहाता तालुका क्रीडा समिती, प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी आणि प्रवरा सैनिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर व प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ११३ पदकांची कमाई केली.

 

या स्पर्धेत दोन्ही शाळांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत ६१ सुवर्ण, ४० रौप्य आणि १२ कांस्य पदके पटकावली. खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे शाळांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत मानाचा तुरा रोवला गेला आहे.खेळाडूंची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळा प्रशासनाने दिलेले प्रोत्साहन यामुळे हे यश संपादन करता आले.

 

क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय, राहता तालुका क्रीडा समिती, प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी व प्रवरा सैनिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर, व प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. या यशासाठी प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या प्राचार्य सौ.विद्या घोरपडे,प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य के.टी अडसूळ तसेच दोन्ही शाळेला जलतरण प्रशिक्षण देणाऱ्या सुचित्रा तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

 

 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे डॉ. महेश खर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!