अहिल्यानगर जिल्हा

रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयातील अरविंद डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

ॲस्पायर फाउंडेशन, नाशिकचा सन्मान; शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

पढेगाव – रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पढेगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक अरविंद दिनानाथ डोंगरे यांना ॲस्पायर फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेऊन ॲस्पायर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संस्थेचे प्रतिनिधी विविध सामाजिक माध्यमांद्वारे शिक्षकांच्या कार्याची माहिती घेतात. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा हा मान अरविंद दिनानाथ डोंगरे यांना मिळाला आहे.

 

डोंगरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एस. एस. साळवे, पर्यवेक्षक दिलीप बनकर, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीचे सदस्य अच्युतराव बनकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक रामभाऊ लिप्टे, संचालक वाय. जी. बनकर, स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य बापूसाहेब काळे, शिवाजीराव लबडे, सरपंच किशोर नाना बनकर, उपसरपंच सचिन तोरणे, डॉ. रघुनाथ लबडे, नेताजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितदादा बनकर, सेजल उद्योग समूहाचे अध्यक्ष जितेंद्र तोरणे, मुकुंद लबडे,मधुकर लबडे,ज्येष्ठ नागरिक शशिकांत राजवळ, माजी प्राचार्य राजधर पोळ, प्रवीण लबडे, नामदेव कांदळकर, अविनाश काळे, सोनलकुमार तोरणे, प्रशांत लिप्टे, माऊली कांदळकर, वीरभद्र मुंजाळ, बापूसाहेब मुंजाळ, सोसायटीचे चेअरमन गणेश बंगाळ व नितीन भुजबळ, विश्वास बनकर, युवराज बनकर यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि मित्रपरिवाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!