(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी-वाचनामुळे ज्ञानवृद्धी, व्यक्तिमत्त्व विकास आणि वैचारिक प्रगल्भता वाढते. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते वाचन न करता ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे प्रतिपादन पायरेन्स आय.बी.एम.ए.चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी केले.
पायरेन्स संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या संकल्पनेतून, तसेच संस्थेचे सचिव व संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पायरेन्स आय.बी.एम.ए., डॉ. विखे पाटील आयुर्वेदिक मेमोरियल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आणि महाविद्यालय, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयबीएमएमध्ये स्पर्धा परीक्षा पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
डॉ. तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या जिद्द, शिस्त, कठोर परिश्रम आणि ज्ञाननिष्ठेचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रंथपाल संजय औताडे यांनी डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक योगदानाची माहिती दिली. पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी डाॅ.श्यामकुमार भुतडा, डाॅ.अमोल घनघाव,महेंद्र खर्डे,दिया रांधवन,श्रध्दा थोरात आदी मनोगत व्यक्त केले. नर्सिंग महाविद्यालयातही विद्यार्थ्यांना नियमित वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.आयबीएमएच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमबीए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी पायल रहाणे हिने केले.