
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, लोणी येथील एमसीए अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. मयुरी संतोष चिने हिची अहिल्यानगर विभागाच्या आंतरविभागीय स्तरावरील क्रिकेट संघात निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील संस्थेचे संचालक तथा सचिव डॉ. निलेश बनकर, आय बी एम ए चे संचालक डॉ मोहसीन तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणे महत्त्वाचे असते. अशा संधींचा लाभ घेत मयुरी चिने हिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विभागीय संघात स्थान मिळविले आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळणार आहे.विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम पायरेन्सच्या माध्यमातून केले जाते. मयुरीची विभागीय संघात झालेली निवड ही तिच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिक्षणासोबतच मला क्रिकेटची मोठी आवड आहे. पायरेन्स संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मला येथे क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांनी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या सोबतच येथील भव्य दिव्य क्रीडांगण योग्य ते मार्गदर्शन यामुळे मला हे यश मिळवता आले असे मयुरी चिने सांगितले.



