
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक १ मधील ब्रीजलालनगर, ओमनगर आणि गवारे नगर परिसरातील विविध ठिकाणी हायमॅक्स दिवे कार्यान्वित करण्यात आले. या दिव्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
परिसरातील नागरिकांना आवश्यक प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. रात्री उशिरा तसेच अपरात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, महिला भगिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे आणि परिसरातील रस्ते प्रकाशमान व्हावेत, या उद्देशाने हायमॅक्स दिवे सुरू करण्यात आले आहेत. या सुविधेमुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून, रात्रीच्या वेळी ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.
आ. विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक प्रभागातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविणे आणि विकासकामांना गती देणे, यावर नगरपरिषद प्रशासनाचा भर आहे. विकासाचा विश्वासनामा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, दीपावलीपूर्वी शहरातील उर्वरित हायमॅक्स दिवेही कार्यान्वित करण्यात येतील, असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मधील ब्रीजलालनगर, ओमनगर आणि गवारे नगर परिसरात हायमॅक्स दिवे सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसरात प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आ. विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आणि सर्व नगरसेवकांचे आभार मानले.
याप्रसंगी वैभव आढाव, वैभव गिरमे, मनोज शेठ अग्रवाल, दीपक जपे, राहुल खरात, राजेंद्र गायकवाड, निसार शेख, सिद्धेश कपिले, संजय खरोटे, भावसार साहेब, सौ. दीपाताई वैभव गिरमे, सुभान सर, देवा बागुल, सौरभ होते, श्रीकांत पायमोडे, ज्ञानेश्वर शिणगर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.