(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी-शालेय क्रीडा क्षेत्रात आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. १४, १७ आणि १९ वर्षांखालील अशा तिन्ही वयोगटांमध्ये विजेतेपद पटकावत विद्यालयाच्या संघांनी यशाची हॅट्ट्रिक साधली. या दैदीप्यमान विजयामुळे तिन्ही संघांची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर येथे तसेच पुणे येथे झालेल्या विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
१४ वर्षांखालील गटात प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संघाचा ८-० गोलने धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. १९ वर्षांखालील गटातही विद्यालयाच्या संघाने प्रतिस्पर्धी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संघाचा ४-० गोलने पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. तर १७ वर्षांखालील गटात प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने पुणे ग्रामीण संघावर १-० गोलने मात करत विजेतेपद पटकावले.
तिन्ही गटांतील खेळाडूंनी सांघिक समन्वय, चपळता, अचूक चेंडू नियंत्रण आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
विजयी संघातील खेळाडू
१४ वर्षांखालील गट : दूर्वा काकडे, पूनम मिसाळ, सुकन्या मुरकुंडे, प्रतिज्ञा सरनोबत, आराध्या सुट्टे, अर्पिता वालतुरे, श्रीशा लबडे, हिरल जैन, साक्षी कोळपे, अनुष्का बेनके, वैष्णवी रेपाळे, ज्ञानेश्वरी तमनर, तनुश्री केजभट, कुंजन चव्हाण, प्रतीक्षा आंधळे, श्रेयसी शिंदे आणि दिव्या नाईक.
१९ वर्षांखालील गट : सोनाक्षी सातव, संस्कृती गायके, कार्तिकी आमटे, ज्ञानेश्वरी रिंधे, आरती शेळके, संजीवनी कोळपे, अक्षरा सोलंकर, प्रगती आंधळे, स्वरा हिरवे, स्नेहल शिंदे, अनुष्का जमदाडे, आर्या सोळुंके, अनुष्का मडके, आराध्या तासकर, देविका गायकवाड, स्वराली लाटे, ज्ञानेश्वरी मिसाळ आणि मनस्वी ढमाले.
१७ वर्षांखालील गट : प्रणिती ढवळे, श्रद्धा विधाते, ऋतुजा वालतुरे, ईश्वरी बडक, सोनम माने, खुशी गवळी, अक्षरा दुबिले, सृष्टी करवंदे, समृद्धी कुरंदळे, अनन्या काळे, आर्या जाधव, ज्ञानेश्वरी बेनके, निर्मिती दराडे, शामल वावरे, रिद्धी घोडेचोर आणि आरुषी कचरे. यांचा सहभाग आहे.यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या विद्या घोरपडे आणि स्नेहल सुतार, कल्पना कडू, श्वेता पाटील आणि सुचित्रा तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त डॉक्टर शिवानंद हिरेमठ शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे डॉ. महेश खर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.