अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

इतरांच्या तुलनेत उस भावात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना मागे राहणार नाही-आ.विवेक भैय्या कोल्हे

यंदाचा दुष्काळ भयानक, सामुहिक प्रयत्नांची शिकस्त करून येणा-या प्रत्येक संकटावर मात करू

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दुरदृष्टीच्या विचारातुन ६४ वर्षात अनेक संघर्षाला तोंड देवुन दुष्काळात शेतकरी व पशुधन जगविले, तुटीच्या गोदावरी खो-यात पाणी वाढविण्यांसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले, यंदाचा दुष्काळ मोठा आहे शेतकरी व त्यावर अवलंबुन असणारी साखर कारखानदारी जगविण्यासाठी सर्वांनाच सामुहिक प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे, त्यातच जागतिक परिस्थितीत होणारी भाववाढ आणि उद्योगांवर होणारे प्रहार हे समिकरण अडचणीचे होते अशाही परिस्थितीत इतरांच्या तुलनेत उस भावात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना मागे राहणार नाही अशी ग्वाही आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी दिली. दहा गुंठ्यात २५ ते ३० टन उसाचे उत्पादन कसे आणता येईल यावर सर्वच सभासद शेतक-यांनी प्रयत्न करावे त्यासाठी थेट बांधावर जात उपाययोजना करू असेही ते म्हणाले.

          सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, आमदार विवेक भैय्या कोल्हे, संचालक बाळासाहेब वक्ते, सौ. सरलाताई वक्ते यांच्यासह सर्व आजी माजी संचालकांच्या हस्ते सोमवारी गव्हाणीत उसाची मोळी टाकुन करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

         प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी प्रास्तविक केले. आमदार विवेक भैय्या कोल्हे पुढे म्हणांले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, श्रीमती सुनेत्राताई पवार व सर्व मंत्री महोदय दुष्काळामुळे निर्माण होणा-या प्रश्नांतुन मार्ग काढण्यांसाठी जाणिवपुर्वक काम करत आहे. युध्दजन्य स्थितीमुळे साखर उद्योगास लागणारे सल्फर १८ हजाराहुन सव्वा लाख रूपये टनांवर गेले आहे, अन्य कच्चा मालाचे दर गगनाला भिडले आहे, उसाची एफआरपी वाढली त्या प्रमाणांत केंद्र व राज्य शासनाने साखर विक्रीचे दर, इथेनॉल- सहवीज निर्माती खरेदी दरात वाढ करून साखर कारखानदारीस तात्काळ मदत करावी, इथेनॉल निर्मीतीचे धोरण ठरवावे तरच हा सहकार जगेल अन्यथा त्यावर अवलंबुन असणारी व्यवस्था कोलमडुन पडली तर पुढचे सगळेच अवघड होवुन बसेल. दुष्काळात दुरवरून उस आणणे परवडणारे नाही तेंव्हा शेतक-यांनी कमी क्षेत्रात, कमी पाण्यांत ठिबकचा सर्वाधिक वापर करून अधिकचे उस उत्पादन घेवुन साखर उद्योगासह आपल्याकडील पशुधन जगवावे, बायोचार बांबु पासुन शेतक-यांना आधार निर्माण करण्यासाठी जनजागृती करू, आधुनिकतेत संजीवनी कधीही मागे नाही. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतक-यांच्या हातुन यंदाचा खरीप हंगाम वाया गेला, रब्बी हंगामाचे काय होईल हा प्रश्न आहे अशाही परिस्थितीत महायुती शासनाकडुन गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी जगविण्यांसाठी जाणिवपुर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, त्या त्या क्षेत्रात तज्ञ असणा-या कार्यकर्त्यांची समिती करून येणा-या प्रत्येक संकटावर मात करण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन शेतक-यांच्या पाणीपटटीवर आकारला जाणारा सेस कमी करण्यासाठी प्रयत्न करू, साईबाबा कॉर्नर ते संजीवनी सीमेंट काँक्रीट रस्त्यासाठी २० कोटीचा निधी आणुन काम सुरू केले आहे तर शहरातही विविध विकास कामांसाठी २० कोटींचा निधी मंजुर करून आणला आहे, १५० विंधन विहीरीची (बोअरवेल) दुरूस्ती सुरू केली आहे. ग्रामिण भागातील प्रश्न व प्रत्येक रहिवासीयांच्या समस्या काय आहेत याचा अभ्यास करून त्यादृष्टीने पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व व्यवस्थापनाची बैठक घेवुन त्यातुन विकासासाठी पुढे जाण्यांचे मार्गांकमण सुरू ठेवले आहे.याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठीत, उस उत्पादक सभासद आदि मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.

 

तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वालदेवी, आळंदी, वाघाड, पालखेड, काश्यपी, गौतमी, मुकणे, भाम, भावली, वाकी, मुकणे उंचीवाढ, निळवंडे आदि धरणांची कामे मार्गी लावुन पश्चिमेचे समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्यांसाठी जे प्रयत्न केले त्यामुळेच येथील शेतकरी संकटातही तग धरून आहे असे बिपीनदादा कोल्हे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!