(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील ६१ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वाकडी खंडोबाची येथे महसूल, कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
शनिवार, १० ऑक्टोबर रोजी झालेल्या या पाहणीदरम्यान शेतातील पिकांची अवस्था आणि नुकसानीची पाहणी करण्यात आली.तालुक्यात महसूल पंचायत कृषी विभागाकडुन दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे गतीने सुरू आहे.राहाता तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि कृषी विस्ताराधिकारी आरगडे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे, अण्णाभाऊ कोते, लोकनियुक्त महिला सरपंच रोहिणीताई आहेर, उपसरपंच सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य कैलास लहारे, बाप्पू गोरे, विजय सदाफळ, अभय राजे, बाबा शेळके, बी. एल.आहेर कामगार तलाठी अमित टिळेकर,ग्रामपंचायत अधिकारी गोटीराम मडके कृषी सहाय्यक निर्मळ मॅडम आणि भास्कर गोरडे आदी उपस्थित होते. दुष्काळामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पाहणीच्या माध्यमातून शेतातील सद्यःस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली.