अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

घटस्थापनेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र एकविरा येथून ज्योत आणण्यासाठी जळगावचे युवक रवाना

छत्रपती धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळाचा सलग चौथ्या वर्षी उपक्रम; जळगाव पंचक्रोशीतील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

राहाता – तालुक्यातील श्रीक्षेत्र जळगाव येथील मुंजोबा चौकातील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने घटस्थापनेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र एकविरा येथून पायी ज्योत आणण्याचा उपक्रम यंदा सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे. जळगाव पंचक्रोशीतील युवकांचा या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग असून, मंडळाच्या वतीने सलग चार वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे.बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र एकविरा येथून ज्योत आणण्यासाठी जळगाव येथील युवक रवाना झाले. जळगाव पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज मंदिरात दर्शन घेऊन व आशीर्वाद घेत ‘आई एकविरेचा उदो उदो’ असा जयघोष करत युवकांनी श्रीक्षेत्र एकविराकडे प्रस्थान केले. मुंजाबा चौकातून उत्साही आणि भक्तिमय वातावरणात युवकांना रवाना करण्यात आले.गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी युवक श्रीक्षेत्र एकविरा येथून ज्योत घेऊन श्रीक्षेत्र जळगावकडे पायी निघणार आहेत. या पायी प्रवासादरम्यान राजगुरुनगर आणि आळेफाटा येथे युवकांचा मुक्काम होणार आहे. त्यानंतर युवक ज्योत घेऊन जळगावकडे मार्गस्थ होतील.रविवारी ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर श्रीक्षेत्र एकविरा येथून आणलेल्या ज्योतीचे श्रीक्षेत्र जळगाव येथील मुंजाबा चौकात आगमन होणार आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने वाजतगाजत ज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे.

छत्रपती धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने सलग चार वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाला जळगाव पंचक्रोशीतील युवकांचा दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.घटस्थापनेच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रीक्षेत्र एकविरा येथून ज्योत घेऊन येणाऱ्या युवकांच्या आगमनाची ग्रामस्थांना उत्सुकता असून, ज्योतीच्या स्वागतासाठी जळगाव ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!