अहिल्यानगर जिल्हा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती व भविष्यातील जलव्यवस्थापनावर चर्चा; जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे मंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राळेगणसिद्धी – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी भेट घेवून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीत पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यातील जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता जलसंधारणाच्या कामांना अधिक प्राधान्य देण्याच्या त्यांच्या सूचनेची अमंलबजावणी करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

 

मध्यंतरी अण्णा हजारे उपचारांसाठी मुंबई येथे रूग्णालयात दाखल झाले असताना त्यांची भेट घतली होती.उपचारानंतर पुन्हा राळेगण येथे अण्णा हजारे आल्याचे समजल्यानंतर पारनेर येथील टंचाई आढावा बैठक झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी त्यांची गावातील यादवबाबा मंदिरात भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.विनायक देशमुख सुजित झावरे अशोकराव सावंत यावेळी उपस्थित होते.मंत्री विखे यांनी त्याच्या तब्येतीची चौकशी केली.राज्यातील दुष्काळी परीस्थीतीच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाली.शासनाकडून सुरू असलेल्या उपाय योजनांची माहीती मंत्री विखे यांनी दिली.

गावागावांत पाणी अडविणे, पाणी जिरविणे, नाला खोलीकरण, बंधारे, गाळ काढणे तसेच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन यावर सातत्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज चर्चे दरम्यान अण्णा हजारे यांनी अधोरेखित केली.पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून भूजलपातळी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही अण्णा हजारे यांनी सांगितले. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता लोकसहभागातून व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

“आजची दुष्काळी परिस्थिती ही भविष्यासाठी जलव्यवस्थापनाचे धडे देणारी आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविणे यासाठी गावपातळीवर नियोजन करून जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे,” हा मोलाचा शासन कृतीत उतरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल आशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

एकीकडे दुष्काळी परीस्थीती असतानाही राळेगण मध्ये पुर्वी झालेली जलसंधारणाची काम वृक्ष लागवड आणि पाण्याचा प्रत्येक थैंब वाचविण्यासाठी झालेल्या कामामुळे वनराई टिकून आहे.त्याच पध्दतीने दुष्काळावरकायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभाग या तीनही बाबींना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक गावात काम काम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!