अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

महिला बचत गटांना ३ कोटी ४५ लाखांचे कर्जवितरण;मा.आ.स्नेहलताताई कोल्हेंच्या उपक्रमातून महिलांच्या स्वावलंबनाला बळ

दुष्काळी परिस्थितीमुळे कोपरगाव संपर्क कार्यालयात प्रातिनिधिक कर्जवितरण; महिलांशी साधला संवाद

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला बचत गटांना कर्जाचे वितरण करण्यात आले. यावर्षी एकूण ३ कोटी ४५ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देत त्यांच्या हाताला काम आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याला आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.महिला बचत गट हे केवळ बचतीचे माध्यम नसून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरले आहे. बचतीतून आर्थिक शिस्त, आर्थिक व्यवहारातून आत्मविश्वास आणि त्यातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद महिलांना मिळते. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या या चळवळीला सातत्याने बळ देणे, हीच या उपक्रमामागची भूमिका असल्याचे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.

यंदा कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन गावोगावी कर्जवितरण कार्यक्रम न घेता कोपरगाव संपर्क कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात कर्जवितरण करण्यात आले. यावेळी विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी स्नेहलताताईंनी मनमोकळा संवाद साधला.

महिलांच्या अडचणी, बचत गटांचे अनुभव, व्यवसायाच्या संधी तसेच आगामी काळातील अपेक्षा जाणून घेतल्या.सध्या दुष्काळाचे संकट गंभीर असून पाणी हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर स्वतःसह कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.वाढदिवसानिमित्त दुष्काळाच्या संकटातून शेतकरी बांधवांसह सर्व जनतेला सावरण्याचे बळ मिळावे, हे संकट लवकर दूर व्हावे, शेतशिवार पुन्हा हिरवेगार व्हावे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धीचे दिवस यावेत, अशी मनोभावे प्रार्थना स्नेहलताताईं कोल्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या पूर्व मंडल अध्यक्षा अनुपमा सोनवणे, शहराध्यक्ष अनिता गाढे यांच्यासह विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. कर्जवितरणापुरता मर्यादित न राहता महिलांच्या हाताला काम, मनात आत्मविश्वास आणि जीवनात स्वावलंबन देणारा हा उपक्रम अधिक व्यापक व्हावा अशी भावना व्यक्त करण्यात आली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!