अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

आकारपीडित शेतकऱ्यांचा लढा जिंकून दिल्याबद्दल टाकळीभान ग्रामस्थांच्यावतीने ॲड. अजितदादा काळे यांचा जाहीर सत्कार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

टाकळीभान – नऊ गावे आकारपीडित शेतकऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी न्यायालयीन तसेच आंदोलनाचा लढा उभारून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजितदादा काळे यांचा टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. शेतकरी संघटना टाकळीभान व राजेंद्र कोकणे पाटील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळा परिसरातील आकारपीडित शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नासाठी ॲड. अजितदादा काळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयीन लढा उभारला तसेच शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात यासाठी त्यांनी आंदोलनाची भूमिकाही घेतली. अखेर शासनाच्या निर्णयानंतर आकारपीडित शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नुकत्याच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी ताब्यात मिळणार असून.या लढ्याच्या यशाबद्दल टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने ॲड. काळे यांचा गौरव करण्यात आला.

या लढ्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पाठबळ दिले. विखे पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याबरोबरच आकारपीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यपालांची भेट घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत पुढाकार घेतला होता. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे न्यायालयीन लढ्यासोबतच शासनस्तरावरील पाठपुराव्यालाही यश मिळाले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अजितदादा काळे उपस्थित होते. यावेळी राजेंद्र कोकणे पाटील, कार्लस साठे, युवा तालुका अध्यक्ष शरद असने, जिल्हा संघटक भास्करराव तुयर, संपर्कप्रमुख साहेबराव मामा चोरमत, जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष अनिल बोडके, खिर्डीचे सरपंच प्रभाकर कांबळे, युवा अध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी, बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बंडोपंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी देविदास नाईक, नितीन वेताळ, सुजित बोडखे, सोपानराव नाईक, बाबासाहेब वेताळ, बापूसाहेब गोरे, सागर गिरै, सतीश नाईक, सोपानराव येळे, शिवाजीराजे पटारे, काकासाहेब डिके, प्राचार्य जयकर मगर, प्राध्यापक दिलीप कोकणे, गजानन कोकणे, मधुकर मामा गायकवाड, पत्रकार चंद्रकांत मामा लांडगे, दिलीप लोखंडे, अशोक रणनवरे, अर्जुन राऊत, रामेश्वर आरगडे, डॉ. जगताप, संदीप बोडखे, छगन नाईक, रामभाऊ नाईक, दत्तात्रय नाईक, कैलास नाईक, सोमनाथ नाईक, विष्णुपंत खंडागळे, गौरव वेताळ, दिलीप वेताळ, कृष्ण वेताळ, संतोष बोडखे, खंडेराव सरोदे, बाळा कोकणे, संदीप उघडे, सुरेश पटारे, दिगंबर मगर, रणजीत मगर, विलास बोडखे, पांडू भैया मगर, अरविंद साळवे, पांडुरंग थोरात, सतीश कोकणे, अक्षय कोकणे, प्रल्हाद कापसे, बंडू तात्या कोकणे, विष्णुपंत पटारे, अभिमन्यू मगर, डॉ. आदिक, डॉ. नवले, विठोबानाना पवार, लहानुभाऊ नाईक, रेवनात कोकणे, सुनील नाईक, भाऊसाहेब बोडखे, गोरखभाऊ बनकर, बन्या बापू पवार, बंडोपंत पवार, बाबासाहेब बोडखे, अमृत मामा बोडखे, बंडोपंत बोडखे, बाळासाहेब सावंत, केरू जाधव, छगन मामा नाईक, अमोल भाऊ गुळवे, जालिंदर वेताळ, बंडोपंत वेताळ, प्रकाश वेताळ, ऋषिकेश वेताळ, निलेश वेताळ, विलास नाईक, बबन नाईक, श्याम गजभिव, अमोल नाईक, भाऊसाहेब गव्हाणे आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व टाकळीभान ग्रामस्थ आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते. 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!