अहिल्यानगर जिल्हा

आंदोलनासाठी मुंबईत गेलेल्या अहिल्यानगर CJP टीमचा साधेपणाचा आदर्श; घरून आणलेली भाजी-चपाती, फुटपाथवर सामूहिक भोजन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर-मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित आंदोलनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून CJPच्या कार्यकर्त्यांची टीम सहभागी झाली होती.आंदोलनासाठी मुंबईला जाताना कार्यकर्त्यांनी आपल्या घरूनच भाजी आणि चपाती सोबत आणली.

आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर कोणताही दिखावा न करता कार्यकर्त्यांनी फुटपाथवर बसून घरून आणलेले जेवण एकत्रितपणे केले. या प्रसंगातून कार्यकर्त्यांमधील आपुलकी, एकजूट आणि साधेपणाचे दर्शन घडले.

यावेळी डॉ. नितीन दिघे, सुशीलकुमार शेळके, महेश सटाले सर, प्रथमेश दरेकर, राजेंद्र सटाले सर, राहुल गांगर्डे, टी. डी. वणवे, सागर शेळके, पूृथ्वीराज सुरते,पावन सुकासे यांच्यासह CJPचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.आंदोलनासाठी मोठ्या सुविधा किंवा दिखाव्याची गरज नसते; आपल्या विचारांवर विश्वास आणि एकमेकांची साथ असणे महत्त्वाचे आहे,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.अहिल्यानगर CJP टीमने आंदोलनात सहभागी होत आपली भूमिका मांडण्यासोबतच साधेपणा, परस्पर सहकार्य आणि संघभावनेचा संदेश दिला.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!