प्रशासकीयमहाराष्ट्रराजकीय

दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारकडे आग्रह; मदत नाही मिळाली तर आंदोलनाचा मार्ग मोकळा : शरद पवार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना सरकारकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी सरकारकडे आग्रह धरणार आहोत. सरकारविरोधात आंदोलन करणे हा आमचा उद्देश नाही. मात्र, सरकारकडून दुष्काळग्रस्तांना मदत मिळाली नाही, तर आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर पक्षाच्या वतीने सरकारकडे करण्यात येणाऱ्या मागण्यांबाबतही चर्चा झाली.

शरद पवार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध मागण्या करण्यात आल्या असून, एकूण १७ मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत.

दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी सरकारशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यावर भर असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. “आम्हाला सरकारविरोधात आंदोलन करायचे नाही. सरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदत मिळवायची आहे. पण, मदत नाही मिळाली तर आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष आर्थिक मदतीबाबत प्रक्रिया सुरू आहे. पंचनामे व नुकसानीचा अहवाल आल्यानंतर मदत निश्चित केली जाईल, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे.दुष्काळग्रस्तांना मदत मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असून, मदत न मिळाल्यास पुढील भूमिका घेण्याचा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!